*तेल्हारा सेवा केंद्राचा वर्धापनदिन साजरा--राजयोगी ब्रह्माकुमार नारायणभाई यांच्या शुभ हस्ते केले केक कटिंग
*तेल्हारा सेवा केंद्राचा वर्धापनदिन साजरा--राजयोगी ब्रह्माकुमार नारायणभाई यांच्या शुभ हस्ते केले केक कटिंग
तेल्हारा
प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय तेल्हारा सेवा केंद्राचा वर्धापन दिन दि.16 सप्टेंबर ला राजयोगी ब्रह्माकुमार नारायण भाई यांच्या शुभ हस्ते केक कटिंग करून व ब्रह्माकुमारी सुमन दिदी,ब्रह्माकुमारी ज्योती दिदी, ब्रह्मा कुमारी प्रमिला दिदी व ब्रह्मा कुमारी स्नेहल दिदी यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा करण्यात आला.मागील पंधरा वर्षांपासून तेल्हारा तालुक्यात ब्रह्माकुमारी प्रमिला दिदी यांच्या माध्यमातून ईश्वरीय सेवेचे कार्य सुरू आहे.ईश्वरीय संदेश सर्व मनुष्यापर्यंत पोहचवून त्यांना सुखी आणि आनंदी व समृद्ध जीवन जगण्यासाठी प्रवृत्त करण्यासाठी विद्यालय 20 विंग च्या माध्यमातून सेवा करीत आहे.तेल्हारा वासीयांच्या सहकार्याने अधिक प्रभावीपणे सेवा करता आली आणि आज ब्राह्मकुमारीज सेवा केंद्राला वेगळी ओळख निर्माण झाली प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे या ईश्वरीय कार्यात व सेवा केंद्राच्या प्रगतीत सहकार्य करणाऱ्या सर्व भाऊ बहिणींचे संचालिका प्रमिला दीदींनी आभार मानले व विशेष धन्यवाद दिले.नारायण भाईंनी सर्व ज्ञानार्थींची ज्ञान आत्मसात करण्याची ओढ बघून सर्वांचे विशेष कौतुक केले.हा उत्साह आणि आनंद विश्व परिवर्तनासाठी एक वैश्विक उदाहरण बनेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.तर सेन्टरला अधिक सुखसुविधा युक्त बनवून सेवा अधिक गतिमान करण्याचा संकल्प तेल्हारा येथील ब्राह्मण परिवारातील भाऊ बहिणींनी केला. ब्रह्माकुमार श्याम भाई यांनी आपल्या सुमधूर गीत गायनाने सर्वांना मंत्रमुग्ध केले.